शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
3
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
4
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
5
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
6
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
7
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
8
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
9
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
10
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
11
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
12
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
13
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
14
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
15
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
16
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
17
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
18
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
19
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
20
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन

श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज महेंद्र पेशवा यांचे कोरोनाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:11 AM

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा (वय ५८) यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन ...

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा (वय ५८) यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. महेंद्र पेशवा यांच्यामागे आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पेशवा घराण्यातील दोन कुटुंबं पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यातील एक कुटुंब म्हणजे कृष्णराव पेशवा यांचे. त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी मोहिनी करकरे. ही सर्व मंडळी पेशवा घराण्यातील अमृतराव पेशवा यांची वंशज आहेत.

महेंद्र पेशवा यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेल्या महेंद्र यांनी स्वत:चा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला होता. राज्यातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्र आणणाऱ्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. श्रीमंत बाजीराव पेशवे प्रतिष्ठानमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. पेशवे यांचा इतिहासाचा अभ्यास होता.