या ग्रामपंचायतीवर शिरूर पंचायत समितीचे सदस्य विजय रणसिंग यांच्या नेतृत्वाखालील म्हसोबा ग्रामविकास पॅनेलने स्पष्ट बहुमत मिळवून चौथ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळविले. सरपंच पदासाठी महेंद्र रणसिंग यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध सरपंच म्हणून जाहीर केले. उपसरपंच पदासाठी कविता चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून जाहीर करण्यात आले. या वेळी १३ पैकी १० सदस्य उपस्थित होते. या वेळी शिरूर पंचायत समितीचे सदस्य विजय रणसिंग, माजी सरपंच रावसाहेब करपे, छाया चव्हाण, माजी उपसरपंच कानिफनाथ गव्हाणे, तेजस यादव पोलीस पाटील किरण काळे,उद्योजक विजय करपे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
फोटो:निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच महेंद्र रणसिंग व उपसरपंच कविता चौधरी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.