पुणे : अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक महेश काळे आणि बासरीच्या मंजूळ स्वरांनी रसिकमनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरते.या जादूई आविष्कारांची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने सोमवारी (२८) पहाटे साडेपाचला महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित या कलाविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्य’मयी होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून लोकमत ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा महेश काळे यांच्या स्वरांनी रसिकांचा पाडवा गोड होणार आहे. या कार्यक्रमात महेश काळे यांच्यासमवेत राकेश चौरसिया यांच्या बासरीची जादूही अनुभवास मिळणार आहे. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर व पखवाजवर ओंकार दळवी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स अणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय काका हलवाई स्वीट सेंटर, खत्रीबंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ऊर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा हे सहयोगी प्रायोजक आहेत. धीरेंद्र अॅडव्हर्टायझिंग हे आऊटडोअर पार्टनर आहेत.
कार्यक्रम स्थळमहालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळदिनांक : सोमवार, २८ ऑक्टोबरवेळ : पहाटे ५.३० वाजताकार्यक्रमाच्या विनामूल्यप्रवेशिका उपलब्ध.
रांका ज्वेलर्स व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., यांच्या सहयोगाने उपक्रम ४‘स्वरचैतन्य’ कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सोमवारपासून (दि. २१) खालील केंद्रांवर मिळतील.
रांका ज्वेलर्स केंद्रलक्ष्मी रोड ४कर्वे रस्तासिंहगड रस्ता, भारत पेट्रोल पंपाजवळ ४रविवार पेठ.काका हलवाई स्वीट सेंटरशॉप नं. २, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, पौड रोड,शॉप नं. १ अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्री, पुणे.अभिनव कला महाविद्यालयाजवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ.खत्रीबंधू पॉटआइस्क्रीम व मस्तानीविठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगरगंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड, शिवाजी पुतळा चौक, कोथरुडशहरातील प्रमुख केंद्रेरसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक, पुणे, बालगंधर्व रंगमंदिर, पुणेयशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे‘लोकमत’ कार्यालय.