सरपंचपदासाठी महेश शेळके व इंद्रजित शेळके यांनी अर्ज दाखल केले होते. त्यासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत शेळके यांना ९ पैकी ५ मते तर इंद्रजित अरुण शेळके यांना ४ मते मिळाली. राजेंद्र विठ्ठल शेळके यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगिता अमोल शेळके, नयना उमेश कराळे, सोनल सचिन पवार, निर्मला दिलीप घोगरे, इंद्रजित अरुण शेळके, प्रियंका महेश शेळके, राणी विश्वास जाधव.
--
पती सरपंच, पत्नी सदस्य
धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभागातून महेश जयवंत शेळके व प्रियंका महेश शेळके हे दाम्पत्य विजयी झाले होते.
त्यापैकी महेश शेळके यांच्या गळ्यात आज सरपंचपदाची माळ पडली. महेश शेळके यांचं शिक्षण बीएस्सी केमिस्ट्री झाले आहे. दहा वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत तर २०१० मध्ये त्यांनी उपसरपंच म्हणून काम पाहिले होते.