लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने बारा वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील पाचव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलींच्या गटात माहिका रेगे हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित माहिका रेगे हिने चौथ्या मानांकित काव्या तुपेचा ६-४ असा पराभव करून आजचा दिवस गाजवला. अव्वल मानांकित काव्या देशमुख हिने सातव्या मानांकित रित्सा कोंडकरचे आव्हान ६-१ असे मोडीत काढले. दुसऱ्या मानांकित ध्रुवा मानेने श्रेया होनकनला ६-२ असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्यपूर्व फेरी :मुले :
समिहन देशमुख (१) वि.वि. आरव पटेल ६-३;
नमिश हूड (४) वि.वि. आर्यन किर्तने ६-१;
वैष्णव रानवडे (५) वि.वि. प्रज्ञेश शेळके ६-०;
रोहन बजाज वि.वि. वेद मोघे ६-५(४);
मुली :
काव्या देशमुख (१) वि.वि. रित्सा कोंडकर (७) ६-१;
माहिका रेगे वि.वि.काव्या तुपे (४) ६-४;
स्वरा जावळे (३) वि.वि.करीश कक्कत ६-१;
ध्रुवा माने (२) वि.वि. श्रेया होनकन ६-२