भोर : भोर नगरपालिकेची मुदत येत्या १८ जुलैला संपत असल्याने नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. यात पूर्वीचे चार प्रभागांचे दोन प्रभाग केले असून फेररचनेत अनेक प्रभाग विभागले गेले आहेत. यामुळे प्रभाग राखीव झाल्यामुळे अनेकांना बाहेरच्या प्रभागात लढावे लागणार आहे.त्यामुळे सत्ताधारी काँॅग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा यांच्याकडून नगरपालिकेला इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ८ प्रभागांतील १७ जागांपैकी ९ महिला आणि नगराध्यक्ष एक अशा १० महिलांना संधी मिळणार असल्यामुळे पालिकेवर पुन्हा एकदा महिलाराज येणार आहे. भोर नगरपालिकेच्या सभागृहात नगरपालिकेची प्रभागरचना व आरक्षण सोडत प्रांताधिकारी मौसमी बर्डे व मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी जाहीर केली. या वेळी सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. शहराच्या २०११ च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्येवर ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मुख्याधिकारी यांनी निवडणुकीचा प्रारुप आराखडा नकाशा, आरक्षण यावर नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडे १७ ते २४ एप्रिलपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनेनंतर २७ एप्रिलला जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत व हरकती सूचनांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडे ३ मेपर्यंत अभिप्राय पाठवण्यात येणार आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त प्रभागरचनेला ८ मे रोजी अंतिम मंजुरी देतील व त्यानंतर ११ मे रोजी जिल्हाधिकारी अंतिम सूचना करतील.भोर शहरात पूर्वी चार वॉर्ड मिळून एक प्रभाग होता. सध्या त्यात बदल करून दोन वॉर्ड मिळून एक प्रभाग केला आहे. त्यानुसार दोन वॉर्डचे ७ प्रभाग व तीन वॉर्डचा एक असे ८ प्रभाग पाडण्यात आले आहेत.>निवडणुकीत नवीन उमेदवारांची दमछाक२०१३ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भोर नगरपालिकेत १७ पैकी १३ नगरसेवक काँग्रेसचे विजयी होऊन आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँॅग्रेसची सत्ता आहे. ४ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. सेना-भाजपाचा एकही नगरसेवक नाही. सध्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून शासनाने नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून द्यावयाचा असल्याने सर्वच पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे. शहराची लोकसंख्या सरासरी २० हजार असून सुमारे १३ हजार मतदान आहे. फेररचनेत झालेल्या नवीन प्रभागाचा फटका सर्वच इच्छुकांना बसणार आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांची निवडणुकीत दमछाक होईल, असेच चित्र आहे.नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून ते थेट जनतेतून निवडून द्यावयाचे आहे. त्यामुळे पालिकेत ५ सर्वसाधारण महिला व एक अनुसूचित जाती-जमाती महिला व ३ नागरिकांचा मागास प्रवर्गातील अशा ९ महिला आणि नगराध्यक्ष मिळून १० महिला असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी२ जागा असून ६ सर्वसाधारण पुरुष राहणार आहेत.भोर नगरपालिका प्रभागरचनाव आरक्षणप्रभाग क्र. १ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव, ब) सर्वसाधारण.प्रभाग क्र. २ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला).प्रभाग क्र. ३ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला).प्रभाग क्र. ४ अ) अनुसूचित जाती-जमाती (महिला) राखीव, ब) सर्वसाधारण.प्रभाग क्र. ५ अ) नागरिकांचामागास प्रवर्ग (महिला) राखीव,ब) सर्वसाधारण.प्रभाग क्र. ६ अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण.प्रभाग क्र. ७ अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण.प्रभाग क्र. ८ अ) नागरिकांचामागास प्रवर्ग (महिला) राखीव,ब) सर्वसाधारण (महिला) राखीव, क) सर्वसाधारण असे आरक्षण राहणार आहे.
भोर पालिकेवर पुन्हा येणार महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:03 IST