बक्षीस वितरण समारंभ ऑनलाइन झाला. या वेळी माजी आयपीएस ऑफिसर किरण बेदी यांनी निकाल जाहीर केले. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, महिला विभागप्रमुख विमल बाफना, ग्रुपचे अध्यक्ष प्रितम भटेवरा, आनंद चोरडिया, भंडारी, धीरज ओस्तवाल, दीपा बाफना, प्रिती बर्मेचा आदी या वेळी उपस्थित होते. भारतासह सिंगापूर, दुबई, थायलंड, नायजेरिया आणि इंडोनेशिया आदी देशांमधून देखील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन आणि ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स यांचे सहकार्य देखील उपक्रमाला मिळाले.
७ ते ९ वर्षे वयोगटात माहीर मोर्बिया याने प्रथम युगम खिंवसरा याने द्वितीय तर ऐश्वी जैन हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ९ ते १२ वर्षे वयोगटात माही ललवाणी हिने प्रथम, विभा पगारिया हिने द्वितीय तर धीर शाह यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १२ ते १५ वर्षे वयोगटात दर्शन गांधी याने प्रथम, हर्षित चोरडिया यांना द्वितीय, तर सुयश जैन यांनी तृतीय क्रमांक मिळविला.