पुणे : स्वारगेट येथील प्रस्तावित महामेट्रोच्या मल्टीमॅाडेल ट्रान्झिट हब मधून येणाऱ्या उत्पन्नातील ५० टक्के म्हणजे अर्धा हिस्सा महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे. तसेच वाणिज्य (व्यापारी संकुलातील) वापरातील बांधकामातील ५० टक्के बांधकाम द्यावे लागणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना प्रस्ताव अभिप्रायासाठी सादर केला होता. त्यास सकारात्मक अभिप्राय आल्याने स्थायी समिती बैठकीत मान्यता दिल्याचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
स्वारगेट येथे २८ हजार चौरस मीटर क्षेत्रात महामेट्रोकडून बहुमजली मल्टीमॅाडेल ट्रान्झिट हब उभारण्यात येणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर संचलनाच्या एकूण उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा पुणे महापालिकेला द्यावे लागणार आहे. तसेच बहुमजली हबमधील वाणिज्य वापरातील उत्पन्नातून देखील ५० टक्के वाटा पुणे महापालिकेला द्यावे लागणार आहेत. तसा रितसर ठराव स्थायी समितीने मंजूर करून घेतला आहे. त्यावर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. तो सकारात्मक आल्यामुळे त्याला स्थायी समितीने मंजुरी दिल्याचे अध्यक्ष रासने म्हणाले.
----------------------