शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

Mahrashtra Election 2019 : विश्वंभर चाैधरी यांची माघार ; निवडणूक न लढविण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 8:10 PM

काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात उतरण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांनी मागे घेतला आहे.

पुणे : काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा विचार करणाऱ्या विश्वंभर चाैधरी यांनी अखेर आपला विचार बदलला असून निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. फेसबुक पाेस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. 

राज्याच्या निवडणूकीत सर्वांचेच लक्ष लागलेल्या काेथरुड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास विश्वंभर चाैधरी यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. चंदक्रांत पाटील यांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज झाले हाेते. त्यांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची ऑफर दिली हाेती. काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत.  आघाडीकडून काेथरुडची जागा मित्र पक्षाला साेडण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याबाबतची घाेषणा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली हाेती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी चाैधरी यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता त्यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. त्यासाठी सर्व विराेधी पक्षांचे एक्य झाल्यास निवडणूक लढविण्यास ते तयार हाेते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने तसेच आपने देखील डाॅ. अभिजीत माेरे यांना उभे केल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी चाैधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

कोथरूड मतदार संघातून विधानसभा लढवावी असा प्रस्ताव मला मित्रवर्य राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यावर खूप विचार करून मी सुद्धा मनाची तयारी केली आणि विरोधी पक्षांमध्ये सर्वसहमती झाली तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली. भाजपाच्या धनदांडग्या आणि धर्मवादी राजकारणाविरोधात सर्वसहमतीचे उदारमतवादी राजकारण आणि लोकशाही वाचवण्याचा अजेंडा यासाठी निवडणूक लढावी हा विचार मी चळवळीतील साथींशी, मित्रांशी बोलून पक्का केला होता.सुदैवाने अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मतांची विभागणी न होता एकत्र लढण्यातूनच बलाढ्य पक्षाच्या उमेदवारांना चितपट केले जाऊ शकते ही धारणा आपण रूजवू शकलो. मात्र शेवटी सर्वसहमती होऊ शकली नाही. मनसे आणि आप यांचे उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित झाल्यानंतर मतविभागणी होणे अटळ आहे. त्यामुळे कालपासून पुन्हा अनेक साथींशी, मित्रांशी, तरूण कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ही मतविभागणी टळावी म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. असे चाैधरी यांनी आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये म्हंटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूक