शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

मह्या भीमानं-भीमानं माय.. हे गाणं गाणाऱ्या कडुबाई यांच्या जीवनावर माहितीपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:24 PM

मह्या भीमानं सोन्यानं भरली ओटी...हे गाणं कुणी ऐकलं की, डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या हातात एकतारी घेऊन उभ्या असलेल्या कडूबाई खरात...

ठळक मुद्देकडूबाई यांच्या आयुष्यात उजेड पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा घरोघरी जागर आवाजातल्या आर्ततेला माणसामाणसांना भिडण्याची ताकद निजात कलेक्टीव्ह नावाने राज्याच्या विविध भागांतील काही तरुणांनी एकत्र येत यासाठी पुढाकार

धनाजी कांबळेपुणे : मह्या भीमानं-भीमानं माय, सोन्यानं भरली ओटीमुडक्या झोपडीले हुती माय मुडकी ताटीफाटक्या लुगड्याले हुत्या माय सतरा गाठीपोरगं झालं साहेब अन् सुना झाल्या साहिबीनीसांगत्यात ज्ञानाच्या गोष्टी...मह्या भीमानं सोन्यानं भरली ओटी...हे गाणं कुणी ऐकलं की, डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या हातात एकतारी घेऊन उभ्या असलेल्या कडूबाई खरात. औरंगाबादमधील चिखलठाणा येथे राहणाऱ्या कडूबाई यांचं गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालं आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्याचं तत्त्वज्ञान त्यांच्या गोड गळ्यातून काळजाला हात घालणारं गाणं झालं. ते आज गावागावांत घुमू लागलं आहे. कडूबाई यांनी एकतारीवर गायिलेल्या मह्या भीमानं-भीमानं माय, सोन्यानं भरली ओटी... या गाण्याला यू ट्यूबवर लाखो लाइक्स आणि शेअरिंग मिळाली असून, लवकरच त्यांच्या जीवनावर माहितीपट येणार आहे. दोन मुली आणि एका मुलासोबत अतिक्रमित जमिनीवर पत्र्याची झोपडी टाकून राहणाऱ्या कडूबाई यांचा लहान वयातच विवाह झाला होता. आई-वडील आणि पतीचे निधन झाल्यावर कडूबाई निराधार झाल्या. यापुढे पोराबाळांसाठी जगायचं, असा निर्धार करून पोटासाठी बारा वाटा करीत, कडूबाई खेडेगावांमधून फिरायच्या. मिळेल ते खायच्या. पण स्वाभिमानानं जगावं, कुणाची गुलामी न करता स्वत:च्या कष्टानं भाकरी मिळवावी, या भूमिकेनं अस्वस्थ झालेल्या कडूबाई यांच्या मदतीला धावून आली ती त्यांची एकतारी वीणा. वडिलांपासून घरात सुरू असलेलं गाणं कडूबाई यांच्या गोड गळ्यात आणखी खुललं आणि या गाण्यानंच कडूबाई यांच्या जगण्याला आकार दिला. कडूबाई अबला म्हणून नव्हे, तर एक स्वाभिमानी माणूस म्हणून जगू लागल्या. कष्टानं मिळालेली भाकरीच खाणार, अशी जिद्द घेऊन जगणाऱ्या कडूबाई यांच्या आयुष्यात उजेड पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा घरोघरी जागर व्हावा, या हेतूने कडूबार्इंच्या हातातल्या एकतारीतूनच बाबासाहेबांच्या आंदोलनांचा अंगार शब्द झाला आणि सुरावटींनी तो गावोगावी घुमला. वामनदादा कर्डक, अण्णा भाऊ साठे तसेच अलीकडील चळवळीतील प्रबोधनाची गाणी कडूबाई गातात. धावत्या जगातल्या अतिवेगवान असलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियावर कडूबाइंर्चं गाण व्हायरल झालं आणि संवेदनशील माणसांनी त्यांचा शोध घेत औरंगाबाद गाठलं. कुणी त्यांना कार्यक्रमांची आमंत्रणं दिली, कुणी त्यांचा सत्कार केला; तर कुणी गानमाऊली म्हणून त्यांचा सन्मान केला. अशा कडूबाई यांच्या गाण्याला आणि त्यांच्या सुराला प्रबोधनाची जोड आहे. आवाजातल्या आर्ततेला माणसामाणसांना भिडण्याची ताकद आहे. मायबापाहून भीमाचे उपकार लय हाय रं...तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं...या गाण्यानं बाबासाहेबांच्या क्रांतीलढ्यानं आम्हाला काय दिलं आणि आम्ही बाबासाहेबांना काय दिलं, याचं तत्त्वज्ञान सांगत चळवळीकडे डोळेझाक करणाऱ्यांच्या डोळ्यांत त्यांनी जळजळीत अंजन घातलं आहे. त्यांची एकतारी आणि गोड गळ्यातलं सामाजिक भान यांनी काही तरुणांना आकर्षित केलं. साधारण वयाने चाळीस-पंचेचाळीसमध्ये असलेल्या कडूबाई यांच्या जीवनाचा मागोवा घेण्याचा तरुणांनी चंग बांधला. निजात कलेक्टीव्ह नावाने राज्याच्या विविध भागांतील काही तरुणांनी एकत्र येत यासाठी पुढाकार घेतला आहे. ओमेय आनंद याने या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनिकेत मोहिते यांनी क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून योगदान दिले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आणि मुंबई विद्यापीठातील प्रा. डॉ. सुनील अवचार, अ‍ॅड. अविनाश सोनवणे, प्रशांत उषा विजकुमार, ओमी नीलांश, अभिषेक,अविनाश सूर्यवंशी, सागर जयराम, जितेंद्र कांबळे अशा तरुणांनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. ह्यकडूबायह्ण असे नाव असलेला ४५ मिनिटांचा हा माहितीपट डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात जगासमोर येईल, असे ओमेय आनंद आणि अनिकेत मोहिते यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAurangabadऔरंगाबादartकलाmusicसंगीत