पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जाधव यास हृदयरोग असून मधुमेहाचा देखील त्रास आहे. आरोपीचे डोळ्याचे कॅटरॅक्ट ऑपरेशन करावयाचे असल्याने व त्यास योग्य तो वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यास कायमचे अंधत्व येऊ शकते, अशी बाजू न्यायालयात मांडण्यात आली. तसेच आरोपीची दृष्टी कायमची जाऊ नये यासाठी त्यास वैद्यकीय उपचार मिळणे हा त्याचा नैसर्गिक अधिकार असून त्यास तात्पुरता जामीन देण्याची विनंती न्यायालयास करण्यात आली. त्यावेळी न्यायालयास तात्पुरता जामीन देण्याचे अधिकार असल्याचे नमूद करत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी न्यायालयाने आरोपीस तुरुंगातुन सुटका झाल्यापासून १ महिन्याकरिता तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तसेच ५०,००० हजार रुपयांचे जात मुचलक्यावर आणि एक महिन्याच्या अवधीनंतर सरेंडर होण्याचे व लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत न जाण्याचे अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.लोंढे याचा कट रचून खून केल्याप्रकरणी त्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संदर्भात पोलिसांनी एकूण 15 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा असा अर्ज जाधव याच्यातर्फे त्याचे वकील ?ड. विजयसिंह ठोंबरे व ?ड. संदीप बाली यांनी दाखल केला होता.
पुण्यातील कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपीस तात्पुरता जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 7:37 PM
आरोपीची दृष्टी कायमची जाऊ नये यासाठी वैद्यकीय उपचार मिळणे हा त्याचा नैसर्गिक अधिकार असून त्यास तात्पुरता जामीन
ठळक मुद्देआरोपीस तुरुंगातुन सुटका झाल्यापासून १ महिन्याकरिता तात्पुरता जामीन मंजूर