विमाननगर : पूर्व वैमनस्यातून सशस्त्र हल्लेखोरांनी येरवड्यात निहाल लोंढे यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वीच तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन मुख्य सूत्रधारासह आणखी एकाला मंगळवारी पहाटे पोलिसांनीअटक केली. जिलानी दामटे, मोसीन शेख या दोघांसह सर्फराज पीरजादे या तीन हल्लेखोरांना येरवडा पोलिसांनी कात्रज परिसरात अटक केली. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या दिवशी (२२ आॅगस्ट रोजी ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी पायथ्याजवळ सादलबाबा चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर निहाल ऊर्फ गंड्या लोंढे (वय.१९,रा. लक्ष्मीनगर येरवडा) याचा अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून जागीच खून केला होता .या हल्ल्यात निहाल याचा मित्र राहुल कांबळे हा गंभीर जखमी झाला होता .याप्रकरणी निहालचे वडील जनार्दन लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खून खुनाचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्हे येरवडा पोलिसांनी दाखल केले होते. खुनाचा गंभीर गुन्हा करून हल्लेखोर फरार झाले होते .या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आमीन शब्बीर शेख (वय १९ रा. कामराजनगर येरवडा)शाहाबाद ऊर्फ मोनू आसिफ अन्सारी (वय१९ रा.लक्ष्मीनगर येरवडा ) व नदीम अहमद शेख(वय १९,लक्ष्मीनगर येरवडा) या तिघांना सापळा रचून अटक केली. न्यायालयाने त्यांना १सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते . या प्रकरणाचा तपास करत असताना चौथा आरोपी सर्फराज अमीन पिरजादे उर्फ दादया (वय २३ रा. कलवड, लोहगाव) याला सोमवारी पहाटे अटक करण्यात आली. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असणारे दोन हल्लेखोर कात्रज परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती . त्यानुसार सापळा रचून जिलानी मोहम्मद रफिक दामटे (वय २४,रा. लक्ष्मीनगर येरवडा) ,मोहसीन मकसूद शेख उर्फ चोकसी( वय २३,राहणार नुराणी मस्जिद जवळ येरवडा) या दोघांना येरवडा तपास पथकानी अटक केली. या गंभीर गुन्ह्यात जिलानी, मोहसीन व सर्फराज यांनी निहालवर तीक्ष्ण हत्याराने वार केले तर इतर आरोपींनी त्यांना मारण्यासाठी व हत्यारे देण्यासाठी तसेच पळून जाण्यासाठी मदत केली होती .निहाल हा आरोपी जिलानी याला वारंवार छोट्या मोठ्या कारणावरून धमकावत असे. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते .बकरी ईदच्या दिवशी निहाल व राहुल हे दोघे तारकेश्वर टेकडी येथे आले असल्याची माहिती जिलानी मिळाली होती. त्याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून निहाल व राहुल यांना मारहाण व त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर ,तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गवारी,सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट,पोलीस हवालदार संदीप मांजुळकर, हनुमंत जाधव, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ वाळके आदींच्या पथकाने या गंभीर होण्याचा तपास केला .
येरवडयातील निहाल लोंढे खून प्रकरणी मुख्य सूत्रधार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 4:39 PM