नीरा : क्रांतिकारकांची जयंती साजरी करणे हे निमित्त आहे. खरे तर समाज एकत्र करून विचारांची देवाणघेवाण होणे हा जयंती साजर करण्याचा मुख्य हेतू आहे. क्रांतिकारकांना समाजा समाजात विभागू नये, ते अखंड हिंदुस्थानासाठी लढले व बलिदान दिले. त्यामुळे जयंती साजरी करताना सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन क्रांतिकारांची जयंती साजरी करणे हीच त्यांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन प्रा. विजय गरजारे यांनी नीरा येथे केले.
नीरा (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३० वी जयंतीनिमित्त प्रा. गरजारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. मंगळवारी नीरा ग्रामपंचायतीच्या इमारतीत व छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमा पूजन व पुष्प अर्पण करून घोषणा देत जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी जि. प. सदस्य विराज काकडे, पुरंदर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा कोमल निगडे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे, जय मल्हार संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष सुजाता जाधव, जय मल्हार क्रांती संघटनेचे शहर अध्यक्ष सुनील जाधव, बौद्ध महासभेचे अध्यक्ष दादा गायकवाड, प्रहारचे मंगेश ढमाळ, ग्रामपंचायतीचे सदस्य राधा माने, वैशाली काळे, प्रमोद काकडे, अनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, अनंता चव्हाण, संदीप धायगुडे, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
सूत्रसंचलन अशोक जाधव, प्रास्ताविक सुनील पाटोळे यांनी केले, तर आभार दादा गायकवाड यांनी आभार मानले.
--
फोटो : ०७ नीरा उमाजी नाईक
फोटोओळ : नीरा (ता.पुरंदर) ग्रामपंचायतीचे सभागृहात आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व्याखानात मार्गदर्शन करताना प्रा.विजय गरजारे व समोर ग्रामस्थ.