पुणे : मध्य प्रदेशातून शस्त्रास्त्रे आणून पुणे शहर व जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका टोळीला हडपसर पोलिसांनी पकडले आहे.या टोळीतील ५ सराईत गुन्हेगारांकडून तब्बल १८ गावठी पिस्तुले व २७ काडतुसे जप्त करण्यात आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पिस्तुल पकडली जाण्याची ही पुणे शहरातील पहिलीच मोठी कारवाई आहे.अरबाज रशीद खान (वय २१, रा. शिरुर), सुरज रमेश चिंचणे ऊर्फ गुळ्या (वय २१, रा. गंगानगर, फुरसुंगी), कुणाल नामदेव शेजवळ ऊर्फ यश (वय १९, रा. शिरुर), जयेश राजू गायकवाड (वय २३, रा. येरवडा), शरद बन्सी मल्लाव (वय २१, रा. काचेआळी, शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण हे त्यांच्या पथकासह हडपसर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक नितीन मुंढे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक सौरभ माने, हवालदार प्रताप गायकवाड, नितीन मुंढे, विनोद शिवले, अकबर शेख, शाहीद शेख, शशीकांत नाळे, प्रशांत टोणपे यांनी फुरसुंगी येथील कानिफनाथ वस्तीजवळ सापळा रचला़ तेथे मोटारसायकलसह थांबलेल्या ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत १८ गावठी पिस्तुले व २७ काडतुसे असा ५ लाख ६८ हजारांचा शस्त्रसाठा मिळाला. हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी पुणे शहर व पुणे जिल्ह्यात पिस्तुल तस्करीचे, मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत़ अरबाज खान हा मंचर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार होता. ......
मध्य प्रदेशातून पिस्तुलाची तस्करीशिरुर येथे राहणारा अरबाज खान हा या टोळीचा प्रमुख आहे. तो मध्य प्रदेशातून पिस्तुलाची तस्करी करुन पुण्यात आणतो. आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याने यापूर्वी पुणे शहर, ग्रामीण, अहमदनगर, शिरुर येथे विक्री केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.शिरुर तालुक्यात खान याला पिस्तुल मॅन आणि विकास तौर याला महाराज या नावाने गुन्हेगारी विश्वास ओळखले जाते. ़़़़़़़़़अनेक गुन्ह्यात यांच्या पिस्तुलांचा वापर पुणे शहर व जिल्ह्यात झालेल्या गोळीबाराच्या अनेक गुन्ह्यात या टोळीने तस्करी करुन आणलेल्या पिस्तुलांचा वापर करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळेच या टोळीने यापूर्वी कोणा कोणाला ही पिस्तुले विकली, याचा तपास करण्यात येत असून ही पिस्तुले यापूर्वी वापरण्यात आली आहेत का याची तपासणी फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात येणार आहे.