शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणातील १६ अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 2:57 PM

२० ग्रामपंचायतीमधील २१२ माजी पंचायतराज सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच 16 अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे

पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी २० ग्रामपंचायतींमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी नियुक्त केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नेमण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषदेने या चौकशीचा अहवाल सादर केला असून २२ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे. आणि २० ग्रामपंचायतीमधील २१२ माजी पंचायतराज सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच 16 अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

या २० ग्रामपंचायतीतील ६९ कर्मचारी त्यांच्या मंजूर आकृतीबंधावर होते. यापूर्वी २४७ जणांची भरती करण्यात आली होती. आणि ते बऱ्याच दिवसांपासून कार्यरत होते. परंतु, या २० ग्रामपंचायतींमध्ये त्या पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी ६५८ जणांची भरती करण्यात आली. हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीत मांजरी ग्रामपंचायतींमध्ये ४४ जणांची भरती झाल्याचे निष्पन्न झाले होते.

कायद्यानुसार विभागीय चौकशीची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार

कर्मचार्‍यांच्या यादीसह अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणे महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाची प्रत महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागालाही सादर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून कायद्यानुसार विभागीय चौकशीची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारीPuneपुणेPoliceपोलिसgram panchayatग्राम पंचायत