पौड (ता. मुळशी) येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हर बोलत होते. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश पवळे, पोलीस नाईक संजय सुपे, पोलीस पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तत्राय रानवडे, पौडचे पोलीस पाटील संजय पिंगळे, रामदास मानकर, संदेश हरगणे, सुरेश तिकोणे, स्वाती गोळे, स्वाती सुतार, शारदा दातीर तसेच विविध गावचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक धुमाळ म्हणाले की, कोरोना काळात आपले गाव सुरक्षित राहावे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची माहिती देणे घेणे, तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत यांच्याशी संपर्कात राहून गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस पाटलांनी रस्त्यावर उतरून काम केले आहे. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना गाड्याची मदत करणे, गावात गरजूंना किराणा किट वाटप करणे तसेच गरजेनुसार तयार जेवणही अनेक पोलीस पाटील यांनी पुरविले आहे. त्यांचे काम उल्लेखनीय आहे.
--
०६पौड पोलिस पोलीस ठाणे सत्कार
फोटो ओळ : कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलीस पाटील स्वाती सुतार यांचा सन्मान करताना अशोक धुमाळ व उपस्थित मान्यवर.