शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 5:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक

ठळक मुद्देजागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली गेले

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरून लस कमी दरात उपलब्ध होईल. हे आधी केले असते तर कमी किंमतीत लस मिळाली असती. केंद्राचे लसीकरणाचे धोरण चुकले आहे. राज्यांपासून शहरांपर्यंत वेगवेगळ्या ऑर्डर दिल्या जात आहेत. लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, रोहित टिळक, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र शनगेकर, लता राजगुरू आदी उपस्थित होते. 

पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेली बालाकोट येथील कारवाईमधील शहिदांच्या नावे मते मागून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद, समता बंधुता ऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष पोसला आहे. लोकशाहीचे दमन केले असून कोरोना काळात नियोजनशून्य कारभार, अहंकार आणि आत्ममग्नता यामुळे देशाची अवस्था वाईट झाली आहे. कलम ३७० पारित करून घेतल्यानंतर दंडुकेशाहीच्या जोरावर काश्मीरमधील उठाव दडपला. नेत्यांना तुरुंगात डांबले. घटनेने दिलेला भाषण व विचार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दडपला गेला. धर्मावर आधारित राजकारण करीत नागरिकत्वाचा कायदा रेटून पारित करण्यात आला.  हिंदुत्वाचा अजेंडा असलेल्या या कायद्याविरुद्ध देशभरात झालेली आंदोलने चिरडल्याचे चव्हाण म्हणाले. 

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली 

नोटबंदीचा निर्णय आणि जीएसटीची ढिसाळ अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी २०१९-२० च्या शेवटच्या तिमाहिमध्ये आर्थिक विकास दर हा नीचांकी ४.२ टक्के होता. कोरोना काळात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर उणे २४ टक्क्यापर्यंत घसरला. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली गेले. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग ही मोदींची चूक 

आत्मनिर्भरतेचा नारा दिलेल्या सरकारने वास्तवात सरकारी कंपन्या, विमानतळ, बंदरे, रेल्वेचे काही भाग मातीमोल भावाने विकून कर्ज भागविले. स्पेस टेक्नॉलॉजीसारख्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या यंत्रणेच्या खासगीकरण घाट घातला. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले असून खर्च वाढला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी डिझेल पेट्रोल दर वाढविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही दर वाढविले जात असून जनतेला खोटे सांगितले जाते. या सरकारला परराष्ट्र धोरणात मोठ्या प्रमाणावर अपयश आले आहे. चीनसोबतचे संबंध बिघडले असून नेपाळ, श्रीलंका हे देशही चीनच्या जवळ गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग घेऊन मोदींनी चूक केल्याचे चव्हाण म्हणाले. सत्तेत आलेल्या भाजपाने दुर्लक्ष केल्याने दुखावलेले शिवसेना, अकाली दल असे पक्ष त्याच्यापासून दुरावले. कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवन या काळ्या कायद्यांमुळे उध्वस्त झाले. मोठ्या उद्योपतींचा फायदा पहिला गेला. असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसMLAआमदारCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत