शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

सॅनिटायझर कंपनीच्या आगीत 18 ठार, पुण्याजवळ औद्योगिक वसाहतीमधील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 6:27 AM

Major fire guts sanitizer factory in Pune, 18 dead : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र माेदींनीही २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

पिरंगुट (पुणे) : पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ महिला कामगार आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र माेदींनीही २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यावर पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनिटायझरमुळे आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने धाव घेतली. घटनास्थळी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

प्राथमिक माहितीनुसार, ३७ पैकी काही कामगार बाहेर पडले. तर १० कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, १८ कामगार अडकले होते. नंतर या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग सुरू केले आहे. आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर तसेच इतर ज्वलनशील रसायनसाठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक लहान-मोठ्या कंपन्या असून, येथे हजारो कामगार काम करीत आहेत. 

केमिकलमुळे भडकली आग- सॅनिटायझरसह अन्य केमिकलही बनविली जात असल्याने या कंपनीत ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकली होती. - अग्निशमन दलाच्या बंबांना आणि जवानांना कंपनीमध्ये आत जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडावी लागली.

कंपनीत बहुतांश महिला कर्मचारीया कंपनीत सुमारे ४५ कामगार असून बहुतांश महिला होत्या. आग लागली त्या वेळी ३७ कर्मचारी आतमध्ये होते. महिलांना बाहेर पडणे शक्य न झाल्याने होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

पॅकेजिंगवेळी शॉॅर्टसर्किटदुर्घटनाग्रस्त एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निकुंज शहा यांच्या मालकीची आहे.दहा वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू झाली. पाणी शुद्ध करण्यासाठीच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते. यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते. ते ज्वालाग्राही आहे. त्याचे पॅकेजिंग करताना शॉॅर्टसर्किट होऊन दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. दीड वर्षापासून येथे सॅनिटायझर बनविले जात होते. 

मृतांची नावे : अर्चना कवडे, संगीता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगीता पोळेकर, माधुरी अंबोरे, मंदा कुलत, त्रिशाला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार, सचिन घोडके.

टॅग्स :Puneपुणेfireआग