पुणे: पुण्यातील विमाननगरच्या सिंबोयसेस कॉलेजजवळ, रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरच स्फोट होऊन आगीची घटना घडली आहे. इमारतीलगत जवळपास १० सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. अग्निशमन दलाकडून ३ वाहने रवाना झाली असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा होता. एकूण 100 सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. 100 पैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात आली असून. सध्या कुलींगचे काम सुरू आहे. आगीत कुठीलीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन मिथिला इमारतीलगत असणारया होरिझन डेव्हलपर्स, निऑन साईटस् याठिकाणी कामगारांच्या पञ्याच्या शेड असलेली घरे होती. शेजारील एका पञा बांधकामाच्या ठिकाणी सुमारे १०० च्या आसपास घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा होता. त्याठिकाणी अंदाजे १० ते १२ सिलेंडर फुटल्याने आग लागली होती. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत आग विझवल्याने मोठा धोका टळला असून सुदैवाने कोणी जखमी नाही. सदर सिलेंडर साठा कोणाचा याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे