मंचर : भविष्यकाळात समाजाच्या रोटरी क्लबकडून खूप अपेक्षा वाढलेल्या असतील. त्या पूर्ण करण्यासाठी रोटरीने सर्व क्षेत्रांत मोठे प्रोजेक्ट राबवावेत. मंचर रोटरी क्लबचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गगार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी काढले.मंचर रोटरी क्लबचा १६व्या पदाधिकार समारंभात ते बोलत होते. या वेळी सचिन चिखले यांनी अध्यक्षपदाची, तर भूषण खेडकर यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. मावळते अध्यक्ष प्रशांत अभंग यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. नूतन अध्यक्ष सचिन चिखले यांनी येणाऱ्या वर्षात समाजाची गरज ओळखून व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्याप्रति विविध प्रोजेक्ट राबविण्याचे आश्वाासन दिले.या वेळी रोटरीचे डिस्ट्रीक्ट डायरेक्टर मंगेश हांडे म्हणाले, की आपल्या मृत्यूनंतर शरीरदानाचा संकल्प समाजाने करावा. आज भारतात शरीराच्या विविध अवयवांची आवश्यकता भासणारे लाखो रुग्ण आहेत. आपल्या पश्चात या रुग्णांचे जीवन आपण आपल्या शरीरदानामुळे वाचवू शकतो. स्त्रियांमध्ये सव्हाईकल कॅन्सर या रोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यावरील उपचारदेखील खर्चिक आहे. अशा रुग्णांसाठी रोटरीमार्फत माफक दरात लसीकरणाची मोहित हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.खासदार आढळराव-पाटील यांनी रोटरी क्लबच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील म्हणाले, की येणाºया काळात जिल्हा परिषद व रोटरी क्लब एकमेकांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल शाळा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या शिक्षणाचा स्तर तसेच त्यांना आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य, शिक्षकांसाठी विविध ट्रेनिंग प्रोग्रॅम यामध्ये रोटरीने लक्ष घालावे, असे आवाहन वळसे-पाटील यांनी केले. बेस्ट रोटरियन आॅफ दि इयर म्हणून भूषण खेडकर, बेस्ट प्रोजेक्ट डायरेक्टर तुषार कराळे व बेस्ट कपल म्हणून सचिन व सीमा चिखले यांना गौरविण्यात आले.व्यवस्था दीपक भेके, सचिन बांगर, आदिनाथ थोरात, बाळासोा. पोखरकर, शरद पोखरकर, अविनाश ढोबळे, बाळकृष्ण इंदोरे, युवराज कानडे, अजय घुले यांनी पाहिली. सचिन काजळे व आशिष पुंगलिया यांनी सूत्रसंचालन केले.
मोठे प्रकल्प राबवावेत : आढळराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:43 AM