शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
4
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
5
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
6
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
7
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
8
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
9
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
10
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
11
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
12
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
13
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
14
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
15
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
16
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
17
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
18
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
19
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
20
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर

बारामती शहरात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्या

By admin | Published: May 23, 2017 5:24 AM

सासवड, जेजुरी नगरपालिकांप्रमाणे बारामती नगरपालिकेनेदेखील शहारामध्ये संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्यावा. सासवड आणि जेजुरी नगरपालिकेने शहरातील सुव्यवस्था आणि शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : सासवड, जेजुरी नगरपालिकांप्रमाणे बारामती नगरपालिकेनेदेखील शहारामध्ये संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्यावा. सासवड आणि जेजुरी नगरपालिकेने शहरातील सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला. सर्वच स्तरातून या दोन्ही नगरपालिकांचे कौतुक होत आहे. त्यामुळे बारामती नगरपालिकेनेदेखील असा निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फैयाज शेख यांनी केली. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये संपूर्ण शहरातील दारूबंदीबरोबरच बारामती शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे. त्यामुळे घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल. शहरामध्ये मुस्लिम, माळी, ख्रिश्चन समाजासाठी समाजमंदिरांची उभारणी करावी, तसेच महिला, मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे आहेत, असे शेख यांनी सांगितले. नगरपालिकेची झालेली हद्दवाढ लक्षात घेता सध्या असणारे नगरपालिका कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यामुळे हद्दवाढ ठिकाणी अनेक कामे खोळंबून राहतात. नागरिकांना एका कमासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. हद्दवाढ झाल्यानंतर नगरपालिकेचे उत्पादनदेखील वाढले आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा ताण लक्षात घेता नवीन कामगारभरती करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच आमराई परिसरातील १०० टक्के पाणीपट्टीवाढीचा ठराव रद्द करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या परिसरात राहणारे नागरिक हे कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्यांच्याकडून पाणीपट्टी आकारली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.