केंदूर : तलाठ्यांनी तीन नोव्हेंबरपासून केलेल्या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सर्व तलाठी रजेवर आहेत.गेल्या दीड वर्षापासून ई-फेरफार प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्याचा वारंवार पाठपुरावा करूनही त्या सोडविण्यात येत नाहीत. या ई-फेरफार प्रणालीत तांत्रिक अडचणी नाहीत, असे शासनाने जाहीर करावे किंवा त्या अडचणी सोडवाव्यात व तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम ढोकले, बंटी ढोकले यांनी केली आहे.(वार्ताहर)
लवकर निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन
By admin | Published: November 18, 2016 5:48 AM