शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

हॉस्पिटलवर ‘हेलिपॅड’ बंधनकारक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:35 AM

गेल्या काही वर्षांत पुणे शहराच्या लोकसंख्येत आणि क्षेत्रफळामध्ये मोठी वाढ झाली आहे.

पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहराच्या लोकसंख्येत आणि क्षेत्रफळामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पुणे आता मुंबईपेक्षादेखील मोठे शहर झाले असून, वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शहरातील हॉस्पिटल्सला ४ एफएसआय लागू होणार असून, इमारती ३६ मजल्याहून अधिक उंच होणार आहेत. त्यामुळे ग्रीन कॅरिडॉरसाठी अशा सर्व इमारतींवर यापुढे ‘हेलिपॅड’ बंधनकारक करा, असा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारण समितीच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.नगरसेवक आबा बागुल यांनी याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारण समितीसमोर ठेवला आहे. सध्याची वाहतुकीची गंभीर स्थिती लक्षात घेता अवयव प्रत्यारोपणासाठी ‘ग्रीनकॉरिडॉर’ करणे भविष्यात जवळजवळ अशक्यच होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवीन हॉस्पिटल्च्या बांधकामांना परवानगी देताना इमारतीवर बंधनकारक करण्याची नितांत गरज आहे. रुग्णांना अत्यावश्यक सेवा वेळेत मिळण्यासाठी आता ठोस पावले उचलावी लागणार आहेत. यासाठी एअरअ‍ॅब्युलन्सची सुविधा उभारण्यास चालना द्यावी लागणार आहे. त्यानुसार महापालिकेने डीसी रुल्समध्ये बदल करणे आवश्यक आहे.>ग्रीनकॉरिडॉरसाठी पर्यायसध्या एअरअ‍ॅब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे, परंतु हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड मर्यादित आहे. या सर्व बाबींचा विचार करता ग्रीनकॉरिडॉर करणे अनिवार्य आहे. पण वाढत्या वाहतुकीचा विचार करता ते अशक्य ठरणार आहे. त्यामुळे नवीन हॉस्पिटल्सना बांधकाम परवानगी देताना इमारतीवर हेलिपॅड बंधनकारक करावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.