पुणे : अयोध्येतील राममंदिराबाबत हिंदंूनी बाळगलेली सहनशीलता आता संपत चालली असून, केंद्र शासनाने त्वरित संसदेमध्ये कायदा करून राममंदिराची उभारणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्टÑीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सोमवारी केली. तसेच राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये म्हणून सत्तेत असलेल्या लोकांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.तोगडिया सोमवारी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४ वर्षांत राममंदिरचा प्रश्न मार्गी लावला नाही, त्याचाच परिणाम म्हणून उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. आता हिंदूंची सहनशीलता संपत चालली आहे. यापुढे कोणताही बहाणा चालणार नाही’’ असे तोगडिया यांनी स्पष्ट केले.राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये यासाठी सत्तेत बसलेल्या लोकांकडून दबाव टाकला जातआहे, मात्र हा दबाव कोणाकडून टाकला जातोय ते वेळ आल्यावरच स्पष्ट करू, असे तोगडिया यांनी सांगितले.तोगडिया म्हणाले, ‘‘गेल्या ३२ वर्षांपासून अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी आंदोलन करीत आहे. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर राममंदिर उभारण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालय केवळ जमिनीच्या मालकीहक्काबद्दल निवाडा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्यासाठीकेवळ ११०० चौरस मीटरचा भूखंड मिळेल. उर्वरित ६७ एकर जागा मशिदीला दिली जाईल अशी भीती वाटते आहे.’’
राममंदिरासाठी संसदेत कायदा करा - प्रवीण तोगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 2:34 AM