पुणे : मराठी भाषिकही इंग्रजी बोलण्यात, शिकण्यात धन्यता मानतात. त्यांची भाषिक अस्मिता बोथट झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर सर्व माध्यमे व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिर्वाय करण्याचा कायदा शासनाने पावसाळी अधिवेशनात मंजूर करायला हवा, अशी मागणी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली आहे. प्रादेशिक भाषांसमोरील धोका ओळखून तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व तेलंगणा-आंध प्रदेश या पाचही राज्यांनी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, असे आवाहन देशमुख यांनी बडोदा येथील अध्यक्षीय भाषणात केले होते. याबाबत समाज माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली होती.याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही हिवाळी अधिवेशनात ‘मराठीची सक्ती करता येणार नाही’, असे विधान शिक्षणमंत्री तावडेयांनी केले. ही भूमिका मराठी हिताविरोधात आहे, असे देशमुख म्हणाले.
शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचा कायदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 4:20 AM