पुणे : कृषी ही भारताची संस्कृती आहे. जर शेतकरी संपन्न असेल, तर देश संपन्न होईल. महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रासाठी देशाचा रोल मॉडेल बनावा अशी भावना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाºया कृषी रत्न पुरस्कार वितरण प्रसंगी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील ११२ व्यक्तींना विविध कृषी पुरस्काराने गौरविले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्य मंत्री सदाशिव खोत, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर या वेळी उपस्थित होते. रायगड येथील मालेगाव येथील चंद्रशेखर भडसावळे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केले. स्मृतीचिन्ह, ७५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राव म्हणाले, विपरीत परस्थितीतह शेतकºयांनी अन्नधान्य, दूध आणि फलोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनविले आहे. देशाची प्रगती ही शेतकरी व त्याच्या उत्पातकता वाढीशी निगडीत आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने २०२२ पर्यंद शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. खात्रीशीर उत्पन्न देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत आहे. त्याचा देशातील १२ कोटी आणि राज्यातील १.२ कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होईल. रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे शेतीचा कस कमी होत आहे. त्यासाठी जमिनीचे आरोग्य राखण्याची योजना राबविली आहे. त्या अंतर्गत राज्यात ७७ लाख मातीचे आरोग्य प्रमाणपत्र वितरीत केले आहे. जलव्यवस्थापन, जलपुनर्भरण, सूक्ष्म सिंचन अशा विविध क्षेत्रात राज्याच चांगले काम सुरु आहे. त्यामुळे राज्य कृषी देशाचा रोल मॉडेल बनावा, अशी भावना राव यांनी व्यक्त केली. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शहराकडे येऊ लागला आहे. जर, गावातच चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी शहराकडे येणार नाहीत. त्यामुळे शेतीला चालना देण्यासाठी जलसिंचनावर लक्ष केंद्रीय केले आहे. त्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून २४ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सिंचनावर केली. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गटाला १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे पाटील म्हणाले.
महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील रोल मॉडेल बनावे : सी. विद्यासागर राव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 4:54 PM
महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.
ठळक मुद्देकृषी पुरस्कार वितरण समारंभ रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे शेतीचा कस कमी होतोय शेतीला चालना देण्यासाठी जलसिंचनावर लक्ष केंद्रीयगटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गटाला १ कोटी रुपयांचा निधी देणार