पुणे : कृषी ही भारताची संस्कृती आहे. जर शेतकरी संपन्न असेल, तर देश संपन्न होईल. महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रासाठी देशाचा रोल मॉडेल बनावा, अशी भावना राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कृषी रत्न पुरस्कार वितरणप्रसंगी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.राज्यातील ११२ जणांना विविध कृषी पुरस्काराने गौरविले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्य मंत्री सदाशिव खोत, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर या वेळी उपस्थित होते.रायगड येथील मालेगाव येथील चंद्रशेखर भडसावळे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केले. स्मृतीचिन्ह, ७५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.राव म्हणाले, विपरीत परिस्थितीतह शेतकºयांनी अन्नधान्य, दूध आणि फलोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनविले आहे.देशाची प्रगती ही शेतकरी व त्याच्या उत्पादकता वाढीशीनिगडीत आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे.शेतकरी मोठ्या प्रमाणावर शहराकडे येऊ लागला आहे. जर, गावातच चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी शहराकडे येणार नाहीत. त्यामुळे शेतीला चालना देण्यासाठी जलसिंचनावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून २४ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सिंचनावर केली. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गटाला १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०१५ - चंद्रशेखर भडसावळे (सगुणा बाग, जि. रायगड)वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१५ - रामचंद्र सावे (चिंचणी, जि. पालघर)वसंतराव नाईक शेतीनिष्ठशेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) २०१५ - मनीष देसले (आसनगाव, जि. पालघर)वसंतराव नाईक शेतीनिष्ठशेतकरी पुरस्कार (आदिवासीगट) २०१५ - कैलास बराड (नेवरे, जि. ठाणे)उद्यान पंडित पुरस्कार २०१५ - पुष्पा कोटकर (बिरवाडी,जि. ठाणे).वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार सन २०१६ - दिलीप देशमुख (काराव, जि. ठाणे)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) सन २०१६ - लक्ष्मण गरूड (आसनपोई, रायगड), विजया पोटे (कल्याण, ठाणे)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) सन २०१६ - विनायक पोटे (मुरबाड, ठाणे), लक्ष्मण पागी (शहापूर, ठाणे), सुरेश भोईर (भिवंडी, ठाणे)कृषिभूषण (सेंद्रिय शेती) (शेतकरी) - स्नेहल पोतदार (डहाणू, जि. पालघर)
महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील रोल मॉडेल बनावे, कृषी पुरस्कार वितरणप्रसंगी राज्यपालांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 1:27 AM