शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शास्त्रीय गतिरोधक बनविण्याचे काम संथ गतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 7:51 PM

शहरातील रस्त्यांवर एकाच पद्धतीचे आणि एकाच आकाराचे गतिरोधक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता

ठळक मुद्देशहरात दीड ते दोन हजार गतिरोधक गतिरोधकाच्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पाण्याचा निचरा होणे आवश्यक गतिरोधक येण्यापुर्वी ४० मीटर अंतरावर ६० सेंटीमीटर आकाराचे हे फलक असणे आवश्यक

पुणे : अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतिरोधक उभारले जातात. या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. त्यामुळे इंडीयन रोड काँग्रेस (आयआरसी) च्या निकषांनुसारच शहरातील रस्त्यांवर एकाच पद्धतीचे आणि एकाच आकाराचे गतिरोधक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली होती. परंतू, या नियमावलीच्या अंमलबजावणीचे काम संथगतीने सुरु असल्याचे चित्र आहे. शहरात दीड ते दोन हजार गतिरोधक आहेत. शहरामध्ये वाहतूक विषयक सुधारणा करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस, आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या बैठकीमध्ये गतिरोधकांविषयीची नियमावली मांडण्यात आली होती. सद्य:स्थितीमध्ये रस्त्यांवर असलेले गतिरोधक अशास्त्रीय स्वरुपाचे आहेत. हे गतिरोधक तयार करताना उंची, रुंदीचे निकष पाळले जात नाहीत. या गतिरोधकांमुळे अनेकदा अपघातांचीच शक्यता अधिक असते. यापुर्वीच्या नियमावलीमध्ये आयआरसीने केलेल्या बदलांचा नव्या नियमावलीमध्ये पालिकेने समावेश केला आहे.पालिकेच्या पथ विभागाने हे काम हाती घतले. तसेच याबाबत क्षेत्रिय कार्यालयांनाही एकाच प्रकारचे गतिरोधक तयार करण्याच्या आणि अस्तित्वात असलेल्या गतिरोधकांनाही नियमावलीनुसार दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार क्षेत्रिय कार्यालय स्तरावरही कामाला सुरुवात करण्यात आली. परंतू, गेल्या पाच महिन्यात ज्या गतीने हे काम व्हायला हवे होते त्या प्रमाणात झालेले नाही. =====रस्त्याची जेवढी रुंदी असेल तेवढ्या रुंदीवर रम्ब्लर स्ट्रीपच्या सुरुवातीला कॅट्स आय (पिवळ्या रंगाचे) लावणे आवश्यक आहे. रस्त्यावरील वाहने गतिरोधकावरून पदपथांवर जाऊ नये यासाठी पदपथांच्या कडेने आणि स्पीडब्रेकरच्या बाजूला प्लास्टिकचे बोलार्डस लावण्यात यावेत. गतिरोधकाच्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पाण्याचा निचरा होणे आवश्यक असल्याचे आणि त्यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या.  ====रस्त्यावर गतिरोधक येण्यापुर्वी वाहनचालकांना सुचना मिळावी याकरिता फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. गतिरोधक येण्यापुर्वी ४० मीटर अंतरावर ६० सेंटीमीटर आकाराचे हे फलक असणे आवश्यक आहे. तसेच गतीरोधकाच्या आधी पाच मीटरवर थर्मोप्लॅस्ट रंगाने रब्मलर स्ट्रीप करणे आवश्यक आहे. तसेच गतीरोधक आयआरसीने दिलेल्या नियमानुसारच रंगवणे आवश्यक आहे. प्रत्येक गतिरोधकाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना असणे आवश्यक आहे. परंतू, अभावानेच या नियमांचे पालन झाल्याचे दिसते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAccidentअपघातMukta Tilakमुक्ता टिळक