पुणे : गेल्या तेवीस वर्षांपासून हास्ययोगाचा प्रचार व प्रसार करणा-या लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षपदी हास्ययोगतज्ञ मकरंद टिल्लू यांची निवड झाली. डॉ. सुभाष देसाई यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. याशिवाय संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. जयंत मुळे , सेक्रेटरी म्हणून अनुराधा भांडारकर व मुख्य सल्लागार म्हणून विठ्ठल काटे यांची निवड झाली आहे. हास्यक्लबच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणा-या मान्यवरांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. यामध्ये डॉ. सुभाष देसाई ( पुणे ), डॉ. माधव म्हस्के (ठाणे), आत्माराम तोरणे ( मुंबई), डॉ. सुषमा दुगड, आदिती वाघमारे ( नासिक), डॉ. दिलीप शहा ( कोल्हापूर ), भानुदास कोळेकर ( पेठ वडगाव ), माणिकराव हंडरगुळे ( लातूर ), व्ही.पी. मदान (नागपूर), कमल कछुवा ( चंद्रपूर) यांचा समावेश आहे. लाफ्टरयोगा इंटरनॅशनल,महाराष्ट्र या संस्थेचे डॉ. मदन कटारिया हे संस्थापक असून, शंभरहून जास्त देशात तसेच महाराष्ट्रात पुणे, नाशिक , मुंबई, ठाणे, सातारा , सांगली, कराड, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, नागपूर, चंद्रपूर अशा अनेक ठिकाणी सुमारे १००० हून अधिक हास्यक्लब आहेत. या राज्यभरातील विविध हास्यक्लबच्या समन्वयाचे काम लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र ही संस्था करते.मकरंद टिल्लू हे एकपात्री कलाकार व मोटीव्हेशनल स्पिकर म्हणून ते सुपरिचित आहेत. हास्यक्लब, शाळा , कॉलेज, विविध कंपन्या, शासकीय कर्मचारी, पोलीस यांच्यासाठी त्यांनी हास्ययोग प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहे.---------------------------------------------------------------------------------------------------------- ‘८० टक्के आजारांचे मूळ ताणतणाव ,काळजी, नैराश्य यामध्ये आहे. हास्याचे व्यायाम केल्यावर शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक बदल घडताना दिसत आहेत. याविषयी शास्त्रीय संशोधन करण्यावर आमचा भर असेल. तसेच राज्यभर हास्ययोग प्रसार व प्रचाराचे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासकीय कर्मचारी, पोलीस दल, वकिल यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याचा आमचा मानस आहे .’ - मकरंद टिल्लू, अध्यक्ष,लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र
लाफ्टरयोगा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षपदी मकरंद टल्लू यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 8:56 PM
गेल्या तेवीस वर्षांपासून हास्ययोगाचा प्रचार व प्रसार करणा-या लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षपदी हास्ययोगतज्ञ मकरंद टिल्लू यांची निवड झाली.
ठळक मुद्देमकरंद टिल्लू हे एकपात्री कलाकार व मोटीव्हेशनल स्पिकर म्हणून ते सुपरिचित१००० हून अधिक हास्यक्लब