पुणे : महिला प्रवाशांसाठी सुरू केलेली ' तेजस्विनी' ही विशेष बससेवा फक्त कागदावरच उरल्याचे चित्र आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेतच बसमध्ये पुरूष प्रवाशांना प्रवास करता येईल, असा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. पण गर्दीच्यावेळीही या बसमध्ये पुरूष प्रवाशांचा भरणा दिसून येत आहे.महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पीएमपीच्या एकुण ६६ बसमार्फत तेजस्विनी ही सेवा पुरविली जात आहे. एकुण ३६ मार्गांवर या बस धावत आहेत. मागील वर्षी जागतिक महिला दिनापासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला पीएमपीच्या ताफ्यात नव्याने आलेल्या ३३ मिडी बस तेजस्विनी म्हणून सोडण्यात येत होत्या. आता त्यामध्ये राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या ३३ बसही या सेवेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपर्यंत या बस केवळ महिला प्रवाशांसाठीच राखीव होत्या. गर्दीच्यावेळी सकाळी व सायंकाळी महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळतो. मात्र दुपारच्या सत्रामध्ये बहुतेक बस रिकाम्या धावत होत्या. त्यामुळे या बस तोट्यात चालल्या होत्या. यापार्श्वभुमीवर पीएमपीने सुरूवातीला केवळ सकाळी ११ ते ५ या वेळेत मिडी बसमध्ये पुरूष प्रवाशांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. तर काही दिवसांपुर्वी राज्य शासनाने दिलेल्या बसमध्येही पुरूष प्रवाशांना प्रवेश देण्यास सुरूवात झाली. पण, पीएमपीने निश्चित केलेल्या वेळेव्यतिरिक्तही या बसमध्ये पुरूष प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. सकाळी ११ वाजेपर्यंत व सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रामुख्याने महिला प्रवाशांची गर्दी असते. यामध्ये नोकरदार महिला, ज्येष्ठ महिला, विद्यार्थिनींचा समावेश असतो. पण पुरूष प्रवासीही बसमध्ये चढत असल्याने या बसेसच्या वेगळेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. ------------दोन दिवसांपुर्वी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीएमपी प्रवासी मंचच्या सदस्य आशा शिंदे यांना हडपसर येथील गाडीतळावर तेजिस्विनीबाबत आलेल्या अनुभव त्यांनी सांगितला. ही बस वारजे माळवाडीला जाणार होती. त्यामध्ये पहिल्याच फेरीत पुरूष प्रवासीही बसमध्ये चढले. याबाबत महिला वाहकाला विचारले असता ही गाडी जाताना जनरल प्रवाशांसाठी असते. वारजे माळवाडी येथून येताना केवळ महिला प्रवाशांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी मार्गफलकाच्या एका बाजूला महिलांसाठी असे नमुद करण्यात आले आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे सकाळी ११ ते ५ यावेळेचा पीएमपीचा दावा पोकळ असल्याचे स्पष्ट होते.------------तेजस्विनी बसमध्ये सकाळी ११ ते ५ यावेळेत पुरूष प्रवाशांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पण गर्दीच्या वेळी केवळ महिला प्रवासीच प्रवास करू शकतात. तशा सुचना वाहकांना दिल्या आहेत. पण यावेळेतही पुरूष प्रवास करत असतील तर सूचना दिल्या जातील.- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
पुण्यात महिलांसाठीच्या '' तेजस्विनी '' बसमध्ये पुरुषांची घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 11:41 AM
महिला प्रवाशांसाठी सुरू केलेली ' तेजस्विनी' ही विशेष बससेवा फक्त कागदावरच उरल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देगर्दीच्या वेळीही पुरूष प्रवाशांचा भरणा सकाळी ११ ते ५ यावेळेतच बसमध्ये पुरूष प्रवाशांना प्रवास करता येईल, असा निर्णयमहिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पीएमपीच्या एकुण ६६ बसमार्फत तेजस्विनी ही सेवा