माळेगाव नगरपंचायत प्रथम
मुख्याधिकारी पदी स्मिता काळे
माळेगाव : माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या मुख्याधिकारी म्हणून स्मिता काळे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी काळे यांनी जनतेच्या सहकार्याने नगरपंचायत माळेगावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यावेळी नगरपंचायत कार्यालयात माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य संजय भोसले, रिपाइंचे तालुका युवक अध्यक्ष विश्वास भोसले, पप्पू खरात, पत्रकार विजय भोसले, सतीश गावडे, योगेश भोसले, दादा सोनवणे, प्रहारचे तालुका अध्यक्ष संजय अहिवळे, मधुकर वाईकर, नेहाल भोसले यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना मुख्याधिकारी स्मिता काळे म्हणाल्या की, नगरपंचायतीचे नियम वेगळे असतात. या नियमानुसार कामकाज केले जाईल. सध्या कामाचा संवर्ग नाही. कामगार संख्या कमी आहे. शासनाकडे संवर्ग मागणी केली जाणार आहे. तूर्तास तरी दररोजची दैनंदिन कामे केली जातील.
नगरपंचायत कामगार संघटना यांच्या वतीने शंकर ठोंबरे, राजू शेख, सुरेश सावंत, सेहवाग सोनवणे, आबा चव्हाण, दादा ठोकळ, दिलीप जाधव, रेश्मा शेख, माया कदम यांनी मुख्याधिकारी स्मिता काळे यांचे स्वागत केले.
अनेकवेळा ‘लोकमत’ने नगरपंचायत माळेगावसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी पाहिजेत, म्हणून पाठपुरावा केला. त्याची शासनाने दखल घेतल्याने ‘लोकमत’चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
ॲड.राहुल तावरे
फोटो ओळी : मुख्याधिकारी स्मिता काळे यांचे स्वागत करताना माजी सभापती, विद्यमान पंचायत समिती सदस्य संजय भोसले.
१४०९२०२१-बारामती-०९