पुणे : इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉपरेरेशनची (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट आरक्षण सेवा सोमवारी रात्रीपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या १० तासांपासून तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणी येत आहेत. सोमवारी संध्याकाळी ९ वाजेपासून आयआरसीटीसीचे संकेतस्थळ स्लो होत गेले, त्यानंतर काही वेळाने त्यावरून तिकीट काढणे अशक्य झाले आहे. संकेतस्थळावर जाऊन प्रवाशांनी तिकीट काढण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक कामांसाठी बंद असल्याचे दाखवत होते. या संदर्भात आयआरसीटीसीतर्फे सव्र्हरमध्ये बिघाड झाला असून त्यावर काम सुरू आहे. तरी लवकरच सुविधा पूर्ववत होईल असे सांगण्यात येत आहे.
आजच्या डिजीटल जगात प्रत्येक गोष्ट ग्राहकांसाठी आॅनलाईन उपलब्ध आहे, एका क्लिकवर आपण कोणतीही वस्तू घरी मागवू शकतो. अशा प्रकारच्या उपलब्ध आॅनलाईन सुविधा आपले जीवन सुखकर करत जरी असल्या तरी तांत्रिक बिघाडामुळे या सुविधा काही क्षण बंद पडल्या तर आपली तारांबळ उडून जाते. असचं काही रेल्वे प्रवाशांसोबत घडलयं. कारण, रेल्वेची प्रसिद्ध असलेली IRCTC ची वेबसाइट अचानक बंद पडली. आॅनलाईन तिकीट बूक करतांना ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट चेक केली असता असे लक्षात येते की, यावेळी वेबसाइटवर मेंटेनन्सचं काम चालू आहे. त्यामुळे वेबसाइटवर तिकीट बूक करतांना ग्राहकांना त्रास होत आहे.