घोडेगाव : माळीण गावावर डोंगर कोसळल्यानंतर आलेल्या पहिल्याच दिवाळीत येथील ग्रामस्थांचे दु:खाचे कढ टिपून घेण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कुटुंबियांसमवेत भेट दिली. ‘माळीरकरांचा भाऊ मीच’ असा त्यांना विश्वास दिला.
माळीण गावावर 3क् जुलै रोजी दु:खाचा डोंगर कोसळून 151 ग्रामस्थ मृत्युमुखी पडले. त्यानंतर आलेली ही पहिलीच दिवाळी. बहुतांश कुटुंबातील कोणी ना कोणी या दुर्घटनेत गेलेले असल्याने दिवाळीच्या काळात ग्रामस्थ सृहदांच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते. त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी त्यांच्यामध्ये जाण्याचा निर्णय वळसे-पाटील कुटुंबियांना घेतली. या वेळी ग्रामस्थांनी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, ‘‘येथील विद्याथ्र्याची सर्व शैक्षणिक जबाबदारी मी स्वीकारली असून, काहीही मदत लागल्यास थेट माङयाशी संपर्क साधा,’’
या वेळी काही महिलांनी भाऊ म्हणून त्यांना औक्षण केले. या वेळी प}ी किरणताई वळसे-पाटील, मंदाताई प्रतापराव वळसे-पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विवेक वळसे-पाटील व त्यांच्या प}ी राणी , भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, संजय गवारी असे वळसे-पाटील परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. या वेळी शंकर मुद्गूण, सुहास झांजरे या ग्रामस्थांनी वळसे-पाटील यांनी माळीण दुर्घटनेत केलेल्या अथक परिश्रमांबद्दल आभार मानले. आपल्या भावना व्यक्त करताना ग्रामस्थ म्हणाले, ‘‘माळीण दुर्घटना घडल्याबरोबरच मदतीसाठी धावून आलेली माणसे राजकारणासाठी घावून आली नाहीत, तर आपल्या भागावर संकट आले म्हणून धावून आली. भीमाशंकर कारखाना, गोवर्धन दूध प्रकल्प, शरद बँक अशा अनेक संस्थांनी मदत केली. सगळ्यांच्या मदतीमुळे माळीण दुर्घटनेतील मृतदेह लवकर बाहेर काढण्यात यश आले. तसेच, सर्वाच्या सहकार्याने माळीण पुन्हा उभे केले जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)