शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

म्हाळुंगे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Published: May 12, 2017 5:27 AM

म्हाळुंगे गावाचा पुणे महापालिकेत समावेशाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा

लोकमत न्यूज नेटवर्कबाणेर : म्हाळुंगे गावाचा पुणे महापालिकेत समावेशाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय म्हाळुंगेकरांनी घेतला. त्यामुळे २७ मे रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी निर्णय घेत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले आहे. ३४ गावे पालिकेत समावेशाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यातच यातील काही गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. ही निवडणूक रद्द व्हावी व होणारा खर्च, वेळ व मनुष्यबळ वाचवावे या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासन महिनाभरात घेणार असून संबंधित गावांनी स्वत: निर्णय घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. दरम्यान, आज (१२ मे) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. १५ मे रोजी प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून माघारीची अंतिम तारीख १७ मे आहे.