पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी सांडपाणी तसेच मैलापाणी नि:सारण व्यवस्था करावी, असा निर्णय शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल बैठकीत घेण्यात आला. मुठा नदी सुधार योजनेच्या वाढीव खर्चाला मंजूरी देतानाच त्यात ही उपसूचना जोडण्यात आली.समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी ही माहिती दिली. मुळा मुठा नदी सुधार योजना संपूर्ण पुण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र त्यात महापालिका हद्दीत नव्यानेच समाविष्ट होणाऱ्या गावांचा समावेश नाही. ११ गावे आधीच समाविष्ट झाली आहेत. आणखी २३ गावे होणार आहेत. त्यामुळे या गावांसाठी महापालिकेने आतापासून योजना तयार करण्यास सुरूवात केली तर नंतर त्याचा त्रास होणार नाही या विचारानेच हा निर्णय घेण्यात आला आहे असे लडकत यांनी सांगितले. समाविष्ट होणारी सर्वच गावे महापालिकेच्या भोवतालची आहेत. त्यांचे पुर्ण शहरीकरण झालेले आहे, पण ग्रामपंचायत असल्याने तिथे चांगल्या नागरी सुुविधा नव्हत्या. त्या देणे हा आता महापालिकेच्या कर्तव्याचाच भाग आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या गावांमध्येही सांडपाणी तसेच मलनि:सारण व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रशासनाला या गावांसाठी केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टिने विचार करण्यास सांगण्यात आले आहे असे लडकत म्हणाले
पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांसाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र; शहर सुधारणा समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 3:57 PM
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी सांडपाणी तसेच मैलापाणी नि:सारण व्यवस्था करावी, असा निर्णय शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देग्रामपंचायत असल्याने तिथे चांगल्या नागरी सुुविधा नव्हत्या : महेश लडकत११ गावे आधीच समाविष्ट, आणखी २३ गावे होणार