पुणे: एमपीएससीच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 आज (शनिवारी) राज्यात होतोय. या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा कार्यलयातील दक्षता पथकामार्फत काही संशयित उमेदवारांच्या तपासणीत एका उमेदवाराकडे गुन्हापात्र साहित्य आढळून आल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईची पूढील प्रक्रिया सुूुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली.