अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती अंर्तगत माळवाडी ते भुतोंडे या ४५ किलो मीटरच्या रस्त्याचे कामासाठी १२ कोटी मंजूर आहेत. त्याचे भूमीपूजन आ. थोपटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, काँग्रेसचे अध्यक्ष शेलेश सोनवणे, कृष्णा शिनगारे, सरपंच शर्मिला लोखंडे, प्रमोद बांदल, नितीन दामगुडे, दिलीप बाठे, काळूराम मळेकर, अंकुश खंडाळे, माऊली नलावडे, विठ्ठल वरखडे, नितीन बांदल, सोमनाथ वचकल, उपअभियंता वाजगे, शाखा अभियंता मेटेकर उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले, कापूरव्होळ-भोर-वाई रस्त्यासाठी २७० कोटी मंजूर आहेत. मात्र, सदरचा रस्ता कापूरव्होळ ते भोर काँक्रिटचा व्हावा अशी शासनाकडे मागणी केली असून यामुळे बजेट ३२५ कोटींवर जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भोर तालुक्यातील ७३ पैकी १० गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या यात एकूण ४१ ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच उपसरपंच विजयी झाले आहेत. तर अनेक गावात सदस्य काँग्रेसचे आहेत. मात्र आरक्षणात सरपंच इतर पक्षाचे झाले आहेत. तर अनेक गावात टी-२० सारखे चांगले खेळाडू एकत्र करून मॅच जिंकतात. तसे अनेक गावात एकत्र येऊन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे टी-२०चा प्रादुर्भाव ग्रामपंचायती निवडणुकीवर झाला आहे, असे आमदार थोपटे यांनी सांगितले.
१२भोर
माळवाडी मळे भुतोडे रस्ता भूमिपूजन करताना आमदार संग्राम थोपटे व इतर.