पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून कोणाला सांगितल्यास करियर बरबाद करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
ओंकार राजेंद्र गलांडे (वय २०, रा. सोमनाथनगर, वडगावशेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१८ पासून सुरू होता.
याप्रकरणी एका ४० वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
या तरुणाने १७ वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या आणाभाका देऊन लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर या मुलीला त्याने तू जर कोणाला काही सांगितले तर मी तुझे फोटाे व व्हिडिओ व्हायरल करेल, तसेच तुला माहीत नाही मी सगळे प्रूफ ठेवतो. तुझे करियर बरबाद करेन असे म्हणून धमकावले. धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.