शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

नवी पेठेत भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, हॉटेलमधील कर्मचाऱ्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 9:19 AM

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता पुण्यासारख्या शहरात तरुणींना रस्त्यावरून फिरणेही अवघड होऊ लागले आहे.

पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता पुण्यासारख्या शहरात तरुणींना रस्त्यावरून फिरणेही अवघड होऊ लागले आहे. क्लासला जाणाऱ्या तरुणींकडे पाहून अश्लिल हावभाव करण्याच्या दोन घटना सदाशिव पेठेत गेल्या आठवड्यात घडल्या होत्या. आता कामावरुन घरी जात असलेल्या तरुणीला पकडून भर रस्त्यात तिचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका हॉटेल कर्मचाऱ्यास अटक केली आहे.राज घनशाम बहादूर थापा (रा. साई शिवनेरी हॉटेल, विठ्ठल मंदिराजवळ, सदाशिव पेठ) असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी नवी पेठेत राहणाऱ्या एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना नवी पेठेतील श्रीराम मेडिकल जवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती.याबाबत पोलिसांनी सांगितले की, राज थापा हा मुळचा नेपाळचा आहे. ही तरुणी बुधवारी रात्री कामावरून घरी जात असताना राज थापा हा तिच्याकडे बघत हसून तिचा पाठलाग करू लागला.मेडिकल दुकानाजवळ त्याने या तरुणीला स्पर्श करून तिचा हात ओढला व तिची मान तिरकी हालवून फिर्यादीला इशारे करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.  या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके अधिक तपास करीत आहेत.