शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सावकारीच्या जाचातून एकाची विष पिऊन आत्महत्या; चिठ्ठीत दोन बड्या हस्तींची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:36 PM

आत्महत्येमुळे शहरात एकच खळबळ

नऱ्हे/पुणे : सावकारी जाचाला कंटाळून एकाने धायरी येथे विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीमध्ये शहरातील राजकीय क्षेत्राशी संबंधित दोघा जणांची नावे असून त्यांच्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यशवंत हरिभाऊ पवार (वय ५४, रा़ रायकर मळा, धायरी) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी धायरीतील पाण्याच्या टाकीवर जाऊन रोगर हे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, यशवंत पवार यांनी गुरुवारी दुपारी २ वाजता आपल्या पत्नीला व्हाट्सऍपवर आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी पाठविली होती. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन रोगर हे विषारी औषध प्राशन केले. पतीने पाठविलेला मेसेज त्यांच्या पत्नीने बराचवेळ पाहिला नाही. सायंकाळी पाच वाजता त्यांनी पतीचा मेसेज पाहिला. त्यानंतर त्यांनी पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोन तरुण डोंगराच्या भागातून जात होते़ त्यांना तिथे मोटारसायकल आढळून आल्याने त्यांनी आसपास पाहिले. तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीवर यशवंत पवार यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. तसेच त्यांच्या नातेवाईकांचे फोन नंबरही त्यात होते. त्यांनी नातेवाईकांना बोलावून घेऊन खात्री केली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून दिला.

यशवंत पवार हे वायरमन असून ते काँट्रक्ट घेऊन काम कराययचे. यशवंत पवार यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. पत्नी कामाला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पतीचा मेसेज पाहिला नव्हता. पवार यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत आपण सावकारीला कंटाळून या दोघांनी माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आणली आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिठ्ठीतील दोन नावाविषयी आताच काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांच्या आत्महत्येबाबत तपास केल्यानंतर आवश्यक तो गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी सांगतले. 

यशवंत पवार यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत शहरातील दोन मोठ्या हस्तींची नाव असल्याने ती नावे आता पोलीस उघड करीत नसल्याचे समजते. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी जितेंद्र जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर यांच्या नावाने चिठ्ठी लिहून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दीपक मानकर यांच्यावर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ ते तुरुंगात आहेत. हाही असाच काहीसा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेSuicideआत्महत्या