शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

‘माणूस’च आता मंगळाच्या राशीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पर्सिव्हिअरन्स हा नासाचा रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरला आणि पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. मंगळावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पर्सिव्हिअरन्स हा नासाचा रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरला आणि पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. मंगळावर रोव्हर पाठवणे नासासाठी नवे नाही. मग ही मोहीम इतकी महत्वाची का आहे? खगोलशास्त्राचे अभ्यासक हर्षल राजे सांगतात, “चंद्रावर माणूस गेला आणि परत आला. पण ते म्हणजे अंगणात जाऊन परत येण्यासारखे आहे. मानवाला मंगळावर पोहोचवून परत आणण्याची जी कसरत साधायची आहे? त्याचे पहिले पाऊल या मोहिमेत आहे. हा रोव्हर मंगळावरच्या साडेतीन अब्ज जुन्या विवरात उत्खनन करणार आहे. पुढच्या मिशनमध्ये तो ऐवज पृथ्वीवर आणला जाणार आहे.” राजे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद -

मार्स २०२०-पर्सिव्हिअरन्स हे एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. काय महत्व आहे हे रोव्हर मंगळावर उतरण्याच्या या टप्प्याचे?

-३० जुलै २०२० रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा स्थित केप कॅनाव्हरन सेंटर वरुन ॲटलस ५ या रॅाकेट ने आकाशात झेप घेतली आणि सर्वांच्याच मनात एक उत्कंठा निर्माण झाली. या मोहिमेला नाव दिले होते ‘मार्स २०२०’. मानवतेची कसोटी पाहणाऱ्या कोरोना काळात या मोहिमेला मूर्त रूप देण्यासाठी शास्त्रज्ञांनी जे काही कष्ट घेतले त्याचे फलित येत्या आठ ते दहा महिन्यांमध्ये समजणार आहे. पर्सिव्हिअरन्स मार्स रोव्हर हा आत्तापर्यंतचा सर्वात आधुनिक आणि सर्वात प्रगत असा मार्स रोव्हर किवा ज्याला एक छोटी रोबोटिक गाडी म्हणू असा तो रोव्हर मंगळाच्या कक्षेत पोहोचला. १८ फेब्रुवारीच्या पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी तो मंगळावर उतरला. पण त्याच्या आधीची जी ७ मिनिटं आहेत ज्यात एन्ट्री, डिसेंड आणि लॅण्डिंग ती खूप काळजीची सात मिनिटे होती. त्या ७ मिनिटांमध्ये मागचा इतिहास असा सांगतो की काहीही घडू शकलं असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांची कसोटी पाहणारा हा काळ होता आणि त्याची सुरुवात झाली तेव्हा नासाच्या कंट्रोल रूममधून पर्सिव्हिअरन्सला आज्ञा गेली की आम्ही आता नियंत्रण सोडतो आहोत. थोडक्यात म्हणजे स्टिअरिंग व्हीलवरून हात बाजूला करत आहोत. आता पुढे तुझं तुला जायचे आहे. ७ मिनिटांमध्ये बराचसा डेटा येत होता. पॅराशूट उघडले होते. पर्सिव्हिअरन्स खाली उतरण्याचा वेग कंट्रोलमध्ये होता. अपेक्षित वेगाने तो खाली उतरत होता. पॅराशूट उघडल्यानंतर जमिनीच्या काही अंतरावर आल्यानंतर त्याची एक मॅकेनिकल क्रेन जी ज्या मिशनमध्ये पहिल्यांदा वापरली गेली त्याद्वारे या रोव्हर जमिनीवर उतरवला गेला आणि पहिला मेसेज आला... ‘पर्सिव्हिअरन्स हॅज लॅण्डेड’.

प्रश्न- आधीच्या मोहीमांनी देखील हे केले आहे. या मोहीमेत वेगळे नेमके काय ?

उत्तर - यापुर्वीच्या मोहिमांनी जे साधले त्या सगळ्याच्या दोन पावले पुढे पर्सिव्हीअरन्स जात आहे. पर्सिव्हीअरन्सवर आधीच्या रोव्हरपेक्षा प्रगत असे कोअर सॅम्पल ड्रील आहे. ते ४५ सॅम्पल घेणार आहे. त्यासाठी निवडली गेलेली जागा आहे ते म्हणजे एका विवराची. हे निवडण्याचे कारण म्हणजे हे विवर पाण्याने भरल्याच्या खुणा आहेत. ते पाणी पुढे जाउन त्याचा एक आकार तयार झाला आहे. आणि त्यामुळेच इथे सूक्ष्म जिवाणू अश्मांच्या रुपात इथे सापडण्याची शक्यता आहे. यासाठी वापरले जाणारे ड्रील देखील अत्याधुनिक आहे. सॅम्पल घेतल्यानंतर त्या रबर ट्युब मध्ये भरुन एका ठिकाणी ठेवून दिली जाणार आहेत. हे झाले की पुढच्या मोहीमांमधून ते परत पृथ्वीवर आणण्याची सोय असणार आहे. आता हे मंगळाच्या उत्तर गोलार्धातले ‘येजेरो’ विवर आहे ते साधारणपणे ४५ किलोमीटर व्यासाचे आहे. साधारण ३.५ अब्ज वर्षांपुर्वी येथे नदीचे अस्तीत्व असण्याची शक्यता फोटोंवरुन लक्षात येते. अशा ठिकाणी जिथे पाण्याचा प्रवाह असतो अशा ठिकाणी सूक्ष्म जिवाणू असण्याची दाट शक्यता असते. हेच या मोहीमेतून शोधले जाणार आहे.

प्रश्न - अनेकांना असे वाटते की इतकी रक्कम खर्चून या मोहीमा नेमके देतात काय?

उत्तर -इतका खर्च करायची गरज काय असं म्हणाल तर मानवाला जे कुतुहल आहे की विश्वात आपणच एकटे आहोत का किंवा अन्यत्र कोठे जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे का, हे शोधण्यासाठीचा हा खटाटोप आहे. आत्ता मंगळावर जे वातारण आहे त्यापेक्षा वेगळे काही वातावरण पूर्वी होतं का हे देखील मोहिमेतुन शोधले जाणार आहे. यापुर्वी जे रोव्हर गेले होते यांच्यामधून एवढी ही वैज्ञानिक माहिती मिळण्याची शक्यता नव्हती. जिथे पाणी आहे असे वाटते तिथेच रोव्हरला उतरवले गेले आहे. या जमिनीतल्या दगडांचे नमुने घेतल्यानंतर उत्तरे नक्की मिळतील. पूर्वी एखाद्या ग्रहावर स्पेसक्राफ्ट पाठवले की ते तिकडचेच व्हायचे. पण या मिशन मध्ये महत्वाचा भाग म्हणजे जाऊन परत येणे. हा प्रयोगाचा महत्वाचा भाग आहे. मानवाला मंगळावर पाठवण्याच्या मोहीमेचाही हा महत्वाचा भाग असणार आहे.

प्रश्न - भारताच्या दृष्टीने या मोहीमेचे महत्व काय ?

उत्तर - मंगळाचे वातारवण हे पृथ्वीच्या खूप जवळ जाणारे आहे. त्यामुळे मंगळावर पुढे मानवी वसाहत केली जाऊ शकते का याची चाचपणी करायची आहे. त्यामुळे त्याला लागणारा खर्च प्रचंड आहे. पण आपण बघितले आहे की भारताला जरी अशी काही मोहीम करायची म्हटले तर आपण ‘मंगळयान’ मोहीम खूप कमी खर्चात करुन दाखवली. तशीच मोहीम भारत देखील करण्याचा विचार या मोहीमेमुळे करु शकतो. मानवाचे पहिले पाऊल मंगळावर पडण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे ‘मार्स २०२०’ मोहीम आहे.

चौकट

मोहीमेची नेमकी उद्दीष्टे

‘पर्सिव्हीअरन्स’ आत्तापर्यंतचं सर्वात आधुनिक आणि क्लिष्ट तंत्रज्ञानाने युक्त असं रोव्हर आहे. पर्सिव्हीअरन्स म्हणजे चिकाटी दाखवत पुढे जाणे. या मोहीमेची महत्त्वाची मुख्य उद्दीष्टे अशी -

१) मंगळावरची सॅम्पल्स घेणे.

२) पूर्वीच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधणे.

३) मायक्रोबीअन लाईफ फॉर्म म्हणजे अश्म स्वरुपातील जीवसृष्टीचा शोध घेणे

४) सर्वात महत्वाचे म्हणजे मंगळावर मानवाचे पहिले पाऊल पडण्यासाठीची वाट तयार करुन देणे.