उरुळी कांचन: पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या फोटो मागितल्याचा कारणावरून दिनांक दिनांक १३ रोजी रात्रीचे वेळी श्रीक्षेत्रबोल्हाई वाडेगाव ता. हवेली जि. पुणे येथे दोन राऊंड गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अजित महादेव जाधव यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याचा कारणावरून दोन गटात वाद झाला. यावेळी एका गटातील एकाने अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दुसऱ्या गटातील दोघांना मारहाण केली. या प्रकरणी तत्परता दाखवत लोणीकंद पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी अजित महादेव जाधव यांनी फिर्याद दिली ,असून ओंकार अंकुश लांडगे (वय-25 वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली), गणेश संजय चौधरी (वय-29 वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याने त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंधाचे फोटो अजित याला मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी गणेश याने दोघांना बोलविले. यानंतर अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दोघांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर ते फरार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच तत्परता दाखवत लोणिकंद पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत १२ तासाच्या आत दोघांना आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. याबाबत अधिक तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करीत आहेत.