शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून तरूणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 4:44 PM

‘मी आत्महत्या करत असूून माझ्या मृत्यूस माझा साडू व मेव्हणी जबाबदार आहेत’ असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून एका तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केली.  

पुणे (लोणी काळभोर) :  ‘मी आत्महत्या करत असूून माझ्या मृत्यूस माझा साडू व मेव्हणी जबाबदार आहेत’ असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून एका तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केली.  ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. चांद रफिक शेख ( वय २८, रा. तारमळा, थेऊर, ता हवेली ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  चांद हा आईवडील एकुलता एक मुलगा होता. आई आजारपणामुळे अनेक महिन्यांपासून अंथरुणाला खिळून तर वडील एका पायाने अधू असल्याने तो कमवेल यांवरच त्यांचे घर चालत होते. चांद याचे पहिले लग्न झाले होते. मात्र तीन वषार्पूर्वी त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २५ जून रोजी त्याने सखाराम नगर, थेऊर येथे रहात असलेल्या सना या तरूणीशी पुणे येथील न्यायालयात त्याने दुसरा विवाह केला. बुधवार (३ जुलै) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे थेऊर येथे कामाला गेला होता. त्यादिवशी त्याचा साडू व मेव्हणी हे त्याच्या घरी गेले व सना हिची आई आजारी असल्याचे कारण सांगून तिला घेऊन गेले होते. तिला दोन दिवसात परत पाठवतो असे सांगितले होते. त्यानंतर चांद व त्याचे वडील सनाला आणण्यासाठी तिच्या घरी गेले तेेंव्हा सनाच्या आई, वडील, बहिण व दाजी यांनी तिला पाठविले नाही. सनालाही त्याने विनंती केली मात्र तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे मंगळवारी ( ९ जुलै ) रोजी रात्री तो जेवला नाही. आज सकाळी साडेदहावाजता त्याने त्याच्या व्हॉटस अपवर आत्महत्या करण्याबाबत स्टेटस लिहिले, मी आत्महत्या करत असून माझ्या मृत्यूस माझा  साडू व मेव्हणी जबाबदार आहे.’  ते वाचल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे रूळावर सापडला.

टॅग्स :Suicideआत्महत्याLoni Kalbhorलोणी काळभोरWhatsAppव्हॉटसअ‍ॅप