पुणे : गणपती उत्सवामध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भाग २ शेलारमळा येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार घडला. नितीन जाधव (वय २५, रा. कात्रज), निखील जाधव आणि राजेश खोडके अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. राहुल उर्फ विकी लक्ष्मण कदम (वय २२, रा. स्वामी समर्थनगर, कात्रज), राजेश मंजुजी खोडके (वय १८), श्रीकांत बायगळे (वय १९), गोविंद बायगळे (वय १९), अनिकेत केंदळे (वय २२) आणि ॠषिकेश नंदुरे (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) यांच्यावर गुन्हा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती उत्सवामध्ये फिर्यादी आणि आरोपींमध्ये भांडण झाली होती. तो राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारून जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचा भाऊ व मित्रालाही लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मदने पुढील तपास करीत आहेत.
एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 4:11 PM
डोक्यात कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भाग २ शेलारमळा येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार घडला.
ठळक मुद्देएकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा कात्रज भाग २ शेलारमळा येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता घडला प्रकार