शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

स्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:16 PM

 त्यामुळेच स्वप्ने ही चमत्कारिक आणि विचित्र वाटतात.

ठळक मुद्देस्वप्न - मराठी कविता आणि मनोवैज्ञानिक दृष्टी  या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन

पुणे : जागेपणी अपु-या राहिलेल्या इच्छा झोपेतल्या एका विशिष्ट अवस्थेत पडतात. या इच्छांची चित्रे एकमेकांवर छापली जाऊन ती वेगाने पुढं नेली जातात.  त्यामुळेच स्वप्ने ही चमत्कारिक आणि विचित्र वाटतात. मात्र ही स्वप्ने पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं, ही स्वप्न पडत असल्यामुळंच आपण निरोगी जीवन जगू शकतो, असं प्रतिपादन ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी केले.

गुरुकुल प्रतिष्ठान आणि 'सत्कार्योत्तेजक सभा, धुळे' यांच्या संयुक्त विद्यमाने स्वप्न - मराठी कविता आणि मनोवैज्ञानिक दृष्टी  या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमात मानसतज्ज्ञ डॉ. सी. जी. देशपांडे, डॉ. मेधा कुमठेकर, तनुजा डफळे, डॉ. लता कांकरिया, लेखक प्रा. श्याम भुर्के, डॉ. भालचंद्र कापरेकर, अमृता देसर्डा आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, सत्कार्योत्तेजक सभेचे अध्यक्ष प्रा. विश्वास नकाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लुकतुके म्हणाले, लहानपणापासून अनेक इच्छा नेणिवेत साठवलेल्या असतात. त्यातल्या काही इच्छा पूर्ण होतात आणि काही अपुऱ्या राहतात. अपु-या इच्छा पूर्ती मागतातच. त्यांची त्याप्रमाणात स्वप्नांद्वारे पूर्ती होते.  त्या प्रमाणात नेणिवेतील इच्छांचा हलकल्लोळ कमी होतो आणि मानवी जगणे सुकर होते.

डॉ. मेधा कुमठेकर यांनी झोपेच्या आणि स्वप्नाच्या विविध अवस्था उलगडून सांगितल्या. त्या म्हणाल्या, स्वप्न प्रत्येक सजीवाला झोपेत पडतात. त्याला कोणीही अपवाद नाही. माणसाला झोप जितकी आवश्यक आहे, तसेच स्वप्न पडणेही आवश्यक आहे.कांकरिया यांनी विविध संस्कृतीत स्वप्नाचा नेमका काय विचार केला आहे, ते उलगडून सांगितलं. डॉ. देशपांडे यांनी स्वप्न आणि त्यांचे अर्थ याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं.समर्थ रामदासांचं आनंदवनभुवनी हे मराठीतलं पहिलं स्वप्न काव्य असल्याचं सांगून डॉ. कामत म्हणाले, ही कविता म्हणजे ओव्यांची प्रकरणात्मक कविता आहे. असामान्य महापुरुष भविष्य सांगत नाहीत तर ते भविष्याचं सूचन करतात. समर्थांनी ते केलं होतं. स्वप्न ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्यांच्या घराण्यात कुणी हे पाहिलं नव्हतं ते स्वप्न त्यांनी मावळ्यांमध्ये पेटवल्यामुळंच ते स्वराज्य निर्माण करू शकले.यावेळी डॉ. भालचंद्र कापरेकर, शुभदा वर्तक, अमृता देसर्डा यांनी मराठीतील स्वप्न काव्यांचा वेध घेतला. 

टॅग्स :Puneपुणे