लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घरगुती आहार घेतानादेखील शक्यतो त्याच्या वेळा नियमित ठेवाव्यात. त्याचप्रमाणे प्रत्येकाने किमान ४५ मिनिटे व्यायाम केला पाहिजे. तसेच पुरेशी व योग्य प्रमाणात झोपदेखील घेतली पाहिजे, असे सत्व लाईफस्टाईल मॅनेजमेंटच्या संचालक डॉ. सोनल पुरोहित यांनी सांगितले.
समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी आहार स्वास्थ आणि जीवनशैली याविषयावर डॉ. सोनल पुरोहित यांचे व्याख्याने आयोजित केले होते. पोलिसांचे धावपळीचे व धकाधकीचे जीवनशैलीमुळे त्यांचे दैनंदिन आहारावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांना विविध आजारपणांचा सामना करावा लागतो. आहारविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या पुढाकाराने या व्याख्याने आयोजन करण्यात आले होते. समर्थ पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार व त्यांचे कुटुंबीय या व्याख्यानाला उपस्थित होते.