बारामती: अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंट फेस्ट इंटॅग्लिओ २०२१ चे आयोजन दि १५ मे २०२१ रोजी ऑनलाईन करण्यात आले. या फेस्टमध्ये बेस्ट आंत्रप्रिनरशिप, टॅलेंट शूट, वेल्फी, कोलाज, एलॉक्युशन, इंटॅग्लिओ इन साईट क्विझ या स्पर्धांचा समावेश होता.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तन्वी दोशी व प्रा. गौरव गुंदेचा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नेहा कोठारी, गायत्री पिटके व शाहरुख पठाण यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. एम. ए. लाहोरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे सचिव मिलिंद शहा (वाघोलीकर) व सदस्य सोनिक शहा (पंदारकर) यांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमासाठी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अहरत दास शहा (सराफ) तसेच सचिव जवाहर शहा (वाघोलीकर) यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. यू. एस. कोळ्ळीमठ यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रवीण यादव व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.