दीपक जाधव।पुणे : मुंबई पाठोपाठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे देखील व्यवस्थापन कोलमडले आहे. व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणाºया विद्यार्थ्यांचा निकाल आॅनलाइन जाहीर होऊन वर्ष उलटले तरी अद्याप एकाही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आलेली नाही. गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्यच धोक्यात आले आहे.इंजिनिअरींग व आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी परीक्षेला हजर असतानाही त्यांना गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण करण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उजेडात आला होता. त्यापाठोपाठ एमबीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका न देण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.या विद्यापीठाच्या अंतर्गत १९१ व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालये आहेत. एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यानंतर अद्यापही त्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आलेले नाही. एमबीएच्या दुसºया सत्र परीक्षेचा निकाल मे २०१७ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला, त्याचीही गुणपत्रिका अद्याप देण्यात आलेली नाही.एमबीएच्या खासगी महाविद्यालयांचे शुल्क लाखांच्या घरात आहे. अनेक विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन एमबीएचे शिक्षणघेत आहेत. त्यांना दरवर्षी बँकांकडे त्यांच्या गुणपत्रिका जमा कराव्या लागतात. वेळेवर गुणपत्रिका जमा न केल्यास त्यांना पुढील वर्षाचे शैक्षणिक कर्ज दिले जात नाही. आॅनलाइन निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्ष झाले तरी गुणपत्रिका मिळाल्या नाहीत यावर विश्वास ठेवायला बँका तयार नाहीत.>परीक्षा विभागप्रमुख नॉट रिचेबलएक वर्षापासून गुणपत्रिका मिळाली नसल्याबाबत परीक्षा विभागाचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्याकडे महाविद्यालय प्रशासनाने संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवी उत्तरे दिली.एकाही महाविद्यालयास अद्यापही गुणपत्रिका का मिळाल्या नाहीत, याचे उत्तर त्यांनी दिले नाही. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
पुणे विद्यापीठाचेही व्यवस्थापन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:17 AM