मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. विशेषता सद्यस्थितीत मंचर शहर व आजूबाजूच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याकरिता जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार मंचर शहरातील कोरोनाप्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांचा वाढता आलेख नियंत्रित करण्यासाठी मंचर शहराचा रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिक आठवडे बाजारात बसणारे शेतकरी, व्यापारी यांनी नोंद घ्यावी व ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले व सदस्यांनी केले आहे. मंचर शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे,असे आवाहन ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने यांनी केले आहे.
मंचरचा आठवडे बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:09 AM