पुणे/नारायणगाव : युरोपियन स्पेस एजन्सीने (इसा) हाती घेतलेल्या मंगळमोहिमेमध्ये भारतामुळे एक पाऊल पुढे पडले आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर आॅफ रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सवर (एनसीआरए) दाखवलेला विश्वास सार्थ ठरला असून, खोडदच्या जीएमआरटी महादुर्बिणीने चोख कामगिरी बजावली आहे. अडीच वर्षांपूर्वी इसाच्या शास्त्रज्ञांनी मंगळयानाच्या मोहिमेतील मंगळयानाचे निरीक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी मोठ्या विश्वासाने एनसीआरएवर सोपवली होती. त्यात आपण मोलाची कामगिरी केली आहे, असे मत एनसीआरएचे अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता यांनी व्यक्त केले.या यशाबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोपने (जीएमआरटी) केंद्राचे निर्देशक प्रा. स्वर्णक्रांती घोष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप उपस्थित होते. प्रा. गुप्ता म्हणाले, ‘‘भारताने अशाप्रकारे पहिल्याच प्रकल्पात मिळविलेले यश हा रेडिओ खगोलशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इसाकडून विचारणा झाल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची योग्य ती पडताळणी करुन आपण त्यांना होकार कळविला होता. माझ्यासह चार शास्त्रज्ञ या प्रकल्पावर सातत्याने काम करीत होते. याशिवाय इसामधील दोन शास्त्रज्ञ भारतातून काम पाहत होते. (प्रतिनिधी)नेमका सिग्नल पकडण्याचे आव्हान नेमका सिग्नल पकडणे हे मोठे आव्हान होते. ही सर्व प्रक्रिया दीड तासाची होती. मात्र पहिली २० मिनिटे फ्रिक्वेन्सी मिळविण्यात गेली. त्यानंतर २० सेकंद सिग्नल मिळाले. त्यानंतर सिग्नल मिळणे बंद झाले़ नंतर आठ मिनिटांच्या एकूण कालावधीतील शेवटचे ७० सेकंद अतिशय कठीण होते.- प्रा. यशवंत गुप्ता युरोपने (इसा) मंगळावर सोडलेल्या एक्सोमार्स यानाचे मंगळावर पोहोचल्यानंतर शेवटच्या २० सेकंदांमध्ये सिग्नल मिळत होते़ शेवटच्या क्षणी काय झाले याचा डेटा मिळाल्यानंतरच या यानाचे कार्य सुरू आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे़ जीएमआरटीच्या आधुनिक डिजिटल अॅँटेनामुळे एक अरब किलोमीटरवरील फ्रिक्वेन्सी मिळविता आली़ तीन दिवसांत पुन्हा सिग्नल मिळतात, की नाही याची माहिती घेण्यात येणार आहे़ - स्टिफन इस्टरहुईझेन, शास्त्रज्ञ, इसाजीएमआरटी करीत असलेले काम युरोपियन स्पेस एजन्सीही करीत होती. मात्र भारताची कामगिरी सरस ठरली. पृथ्वीपासून मंगळावर यान पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने काम केले. - प्रा. स्वर्णक्रांती घोष
मंगळमोहीम भारतामुळे एक पाऊल पुढे
By admin | Published: October 21, 2016 4:32 AM